पुस्तक समिक्षा::-तुमच्या मृत्यूनंतर रडणार कोण ?
तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे हे पुस्तक म्हणजे द माँक सोल्ड हिज फेरारी च्या मालिकेतील तिसर्या पुस्तकातील काही धडे आहेत प्रसिद्ध व्याख्याते रोबिन शर्मा यांच्यात असलेली लेखनशैली आणि बोलण्याची शैली प्रगल्भ विचार आणि काही अनुभवांची शिदोरी घेऊन त्यांनी या पुस्तकात मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
कोणताही पुस्तक वाचताना आपण कंटाळणार नाही ना याची आपण दखल आधी घेत असतो.मी एक वाचक आहे पुष्कळ पुस्तके वाचण्यात आली आहे.पण सर्वांपासून मला नवीन शिकण्यास मिळाले. या पुस्तकाबद्दल आकर्षण निर्माण झाले काही शब्दांमुळे ते असे जीवनाची शोकांतिका- मृत्यू नाही तर आपण जिवंतपणे आपल्यातले सुप्त गुण मारतो ती आहे.एक साधं वाक्य पण त्यात खूप गुढ अर्थ सामावलेला आहे. आणि मग पुस्तकात काहीतरी खास असणार याची चाहूल मला लागली
माझ्यात झालेला बदल:-
यातील धडे अगदी कमी पानाचे. एक गंमत म्हणून हे पुस्तक वाचताना माझ्यामध्ये एक अमुलाग्र बदल घडत गेला. गमतीची जागा वास्तविकतेनी घेतली.आपल्या छोट्याश्या जगात कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घाबरत मतप्रकट करत नाही किंवा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी आपली अंधुक असते म्हणून ज्यावेळी छोट्यातल्या छोट्या गोष्टीचे आपण पूर्ण विचार करतो त्या वेळी नक्कीच आपल्यासाठी ती बदल घडून आणू शकते हे समजले. मोठ्या गोष्टी करताना येणारे अडथळे मोठे असतात असे म्हणतात पण जर छोट्या गोष्टींबद्दल ची संकल्पना आणि व्याख्या समजावून घेतली तर मला वाटतं रॉबिन शर्मासारखे विचारवंत. अनेक धमक असणारे पुष्कळ व्यक्तिमत्व तयार होतील माझ्यातली धमक आणि अंतरंगातील चमक या पुस्तकातून माझ्या लक्षात आली म्हणून या पुस्तकाबद्दल आज मोकळेपणे लिहीत आहे.
जसे की जॉर्ज विल्यम्स म्हणतात एक आकर्षण उपदेशात्मक कथा यात कोणत्याही जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी सोप्या पण आश्चर्यचकित करणाऱ्या कल्पना दर्शविल्या आहेत मी माझ्या सर्व ग्राहकांना हे मौल्यवान पुस्तक सुचवतो. त्यांच्या या मताशी मी सहमत आहे.एक पुस्तक मोठा बदल घडवतो आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे यातूनच उत्तम माणूस घडत जातो.
द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेला प्रतिसाद वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात रॉबिन चा उत्कृष्ट संवाद कौशल्यामुळे त्यांना जगातले नेतृत्व सर्वात यशस्वी आणि प्रमुख विचारवंत बनवले आहे. वैचारिक दृष्टिकोन अशी असावा आणि संवाद शैली याबद्दल रॉबिन सरांनी सुंदर सांगितले आहे
वेगळेपणा:-
वेगवेगळे पुस्तक वाचले सायन्स, खगोल शास्त्रीय, आत्मचरित्र, वाचन करताना नक्कीच रस निर्माण झाला कुतूहल निर्माण झाले परंतु जे बदल विचारांची दिशा, दृष्टिकोन, सवय, संवाद, आदर्श, शांतता, वेळेचे महत्व, अडचणी एक वरदान, हसन, आभार प्रदर्शनाची सुरुवात, प्रेमाचे खाते उघडणे, मालकीहक्क, शुद्ध वातावरण, स्वयंसेवक, संगीत, शांत मन, तक्रार थांबवा, नम्रता यासारख्या नैतिक मूल्यांचे महत्व यामध्ये व्यवस्थित सरळपणे मांडले गेले आहे. हे मूल्य रोजच्या जीवनात आपण अनुभवतो त्यात वेगळं काय आणि कसं करू शकतो ते या पुस्तकातून शिकावं.
जर एक मालक किंवा व्यवसायिक जीवनात अडचणी, बुद्धिवाद, कामाची नियमावली, वास्तविकतेची कल्पना, प्रतिस्पर्धा यांचे मार्गदर्शन, जनसमुदाय या पुढे बोलण्याचे शिक्षण, छोटे विचार थांबून मोठ्या विचारांचा अवलंब करणे यामधून नक्कीच एक व्यवसायिक बनण्यास मदत होईल खूप सारी माहिती आणि त्यासोबत वेगळेपणही जाणवलं
दैनंदिन क्षेत्रात काम करत असताना खरच या वाचनाचा पुरेपूर उपयोग होतो माणूस कृतीतून दर्शवला जातो आणि योग्य कृती साठी योग्य विचारांची जोड हवी असते. याठिकाणी नकारात्मक त्याला खतपाणी घालत नाही त्याठिकाणी सकारात्मकतेचा बीज रोवलं जातं याची जाणीव आणि अनुभव पावलोपावली आले आहेत.
अंतरंगाची तोंडओळख:-
धकाधकीच्या जीवनात प्रवासी म्हणून प्रवास करताना येणाऱ्या प्रसंगात कधी जहाल विचारांना समोरही जातो माणूस त्यावेळी तो त्यातील अंतरंगाच्या विरुद्ध दिशेने जात असावा असं मला वाटते कारण अंतरंग तर एक समाधान देत असतं त्या समाधान आवर आपलं तारुण्य आणि म्हातारपण यांच्यातील दुवा ठरलेला असतो माणूस विचारांनी तरुण होतो आणि विचारांनी म्हातारा .पण समाधानाचे आस नक्की असावी मग अंतरंगाची झलक पाहायला मिळते.
"जीवन जगतात सगळे
पण हरण्याची लाज नसावी
जिंकण्याची सदा हाव नको
त्यात समाधानाची अस असावी".
परिपूर्ण जीवनाचा मागोवा घेण्यास हे लिखाण सुंदर आहे. वयक्तिक आणि व्यवसायिक जीवनाचे संतुलन ठेवण्यास उपयुक्त आहे.
काही वाचकांच्या मतदान बद्दल विचार केला तर ते म्हणतात अयशस्वी माणसाचे आत्मचरित्र वाचावे मीही त्यांच्या विचारांचा आणि मतांचा आदर करते. अगदी सत्यकथन आहे. तुमच्या मृत्यूनंतर रडणार कोण हे पुस्तक यात आलेले धडे, प्रश्न आणि आणि उत्तरासहित आपल्यापुढे ठेवले आहे. सर्व जागच्याजागी असले तरी आपण स्वतःमध्ये बदल करून घेतोय का? वाचन करणं सोपं असतं टीका करणं सोपं असतं पण अवघड असतं ते वाचलेला आत्मसात करणं. थोडं कठीण वाटतं पण त्यानंतर बदलाव के बादल दृष्टीस पडतात. पुस्तक यशस्वी व्यक्तीचे असो किंवा अयशस्वी व्यक्तीचे त्यातला प्रत्येक शब्दात ज्ञानाचे धन मिळत असते निवडलेले पुस्तक कोणाचे त्यापेक्षा त्यात जे काही आवडतं ते आत्मसात करण्यावर आपण भर द्यावा असं माझं मत आहे. तर खऱ्या अर्थाने जीवन परीक्षण झाल्याचा भास होईल.
छायाचित्र काढा, निसर्ग सानिध्यात रहा, कामावर प्रेम करा, परिपूर्णतेने जगा म्हणजे तुम्ही आनंदाने मृत्यूला सामोरे जाल वाहहहहह किती सुंदरतेने मांडले आहे.
रॉबिन शर्मा एक वकील असल्याकारणाने कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची परिपूर्ण नजर आणि निसर्गाशी असणारा जवळीक नातं एक माणूस म्हणून नैतिक मूल्यांची जोपासना उत्तम आहे. एक व्यवसायिक एक उत्तम माणूस ज्यांनी युवापिढीला उत्तम व्यवसायिक, उत्तम माणूस बनण्याची वाट दाखवली, कल्पनाशक्तीला वाव दिला त्यांना खूप खूप धन्यवाद 😊🙏

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा